MAS Admin. Program
वीजदरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी वीजबील होळी आंदोलन

Satara  February 11,2020

  

प्रिय मास सभासद, सस्नेह नमस्कार विनंती विशेष, महावितरणचे आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये निश्‍चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २०% ते ३५% नी जास्त आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीवर पोहोचले आहेत. आयोगाने सप्टेंबर २०१८ च्या आदेशानुसार २०६५१ कोटी रू. म्हणजे १५% सरासरी दरवाढ लादली आहे. त्यापैकी ६% म्हणजे ८२६८ कोटी रू. ग्राहकांकडून मार्च २०२० पर्यंत वसूल केले जाणार आहेत. उर्वरीत ९% म्हणजे १२३८२ कोटी रू. नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० पासून पुढे व्याजासह सर्व ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. ही दरवाढ न परवडणारा प्रचंड बोजा लादणारी आहे. त्याच बरोबर उद्योगांसाठी हानिकारक व राज्याच्या विकासाला खीळ घालणारी आहे. याचे निषेधार्थ बुधवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महावितरण मुख्य कार्यालय, कृष्णानगर, सातारा येथे वीजबील होळी आंदोलनाचा वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय वीज समन्वय समिती ( ECIO-CC) ने ठरविल्या प्रमाणे कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व उद्योजकांनी या परिस्थितीचा गांर्भीयाने विचार करून वीजदरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी वीजबील होळी आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित रहावे. हि विनंती.

कळावे,

टीप : उद्योजकांनी सोबत येताना वीजबील झेरॉक्स प्रत आणावी.

आपला विश्वासू

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

 

धैर्यशील भोसले

सचिव

 

भरत शेठ

चेअरमन, मास वीज कमिटी २०१९