MIDC 
MAS & MIDC Meeting

MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara, 415 004.  October 10,2018

  

 मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) मार्फत सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)  विभागाशी संबंधीत समस्यांबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजी मा. मास पदाधिकारी व मा. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व त्यांचे अधिकारी यांची संयुक्त मिटिंग मासभवन येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)  विभागाशी संदर्भात आपले काही प्रश्न, समस्या व सूचना असतील,  तर ते आगाऊ लेखी स्वरूपात अथवा [email protected] ई-मेल व्दारे किंवा मास पदाधिकारी यांचेकडे दिनांक ०९ ऑक्टोबर २०१८  सायं. ०५.०० वाजेपर्यंत कळवावे, जेणेकरून आपली समस्या सदर सभेमध्ये मांडण्यात येईल.