MAS Admin. Program
मास वर्धापनदिन निमित्त रक्तदान शिबीर

"MASBhavan", P-76, Addl.MIDC, Satara  December 21,2020

माननीय मास सभासद,

दरवर्षी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) वतीने २१ डिसेंबर हा दिवस मास वर्धापनदिन म्हणून आपल्या सर्व उद्योजकांच्या सहकार्याने साजरा करत असतो.  

यावर्षी कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सामाजिक हित पाहता मुख्य कार्यक्रम सद्यस्थितीत आयोजित न करता पुढे कोविड१९ परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे मा. मास पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी ठरविले आहे.

सदर वर्षी मास वर्धापनदिनाचे औचित्य साधून व जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आपल्या सर्वांच्या सहकार्यांने सोमवार, दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायं.०५ वाजेपर्यंत “मासभवन,” येथे आयोजित करण्यात आले आहे.  

सदर शिबीर घेताना संबंधित रक्तपेढी यांनी संबंधित रक्तदात्याला व त्यांचे कुटुंबियांना पुढील एक वर्षभर गरज पडेल, त्यानुसार मोफत रक्ताची पिशवी देण्याचे मान्य केले आहे.

तरी आपण स्वत: व आपल्या उद्योगातील कामगार-कर्मचारी यांचेसह सदर रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावे, ही आग्रहाची विनंती. 

कळावे,

आपला विश्वासू

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

धैर्यशील भोसले

सचिव  