MAS Admin. Program
मासभवन येथे कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ.

"MASBhavan", P-76, Addl. MIDC, Satara  April 21,2021

  

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) या शिखर संस्थेने नेहमीच सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या सहकार्याने लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहेमग ते पूरस्तिथी असो अथवा कोविड-१९. कोविड-१९ विषाणूमुळे वाढती रुग्ण संख्यांची दखल घेऊन निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी, यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत उद्योजकांना आवाहन केले होते. त्याउत्स्फूर्त सहभागातून जमा झालेल्या देणगीमधून मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) तर्फे दोन व्हेंटेलेटर मशीन हॉस्पिटलला देणगी स्वरुपात देण्यात आल्या तसेच कोविड रुग्ण अंत्यविधीसाठी ०४ शवदाहिनी कैलास मशानभूमी येथे लोकार्पण करण्यात आल्या. मासच्या सभासद उद्योजकांनी सुद्धा प्रशासनास अनेक व्हेंटिलेटर, मास्क, PPE किट्स, धान्य, किराणा व इतर लागणाऱ्या वस्तूंची सढळ हस्ते मदत केली आहे व अजूनही करत आहेत.

 

यातील एक भाग म्हणजे सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार-कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी कोविड-१९ लसीकरण करणेसाठी ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा यांचे मदतीने कोविड-१९ लसीकरण केंद्र आज, दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी मासभवन येथे सुरु करण्यात आले. सदर लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मास उपाध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री दीपक पाटील, ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर, साताराचे अध्यक्ष श्री. उदय देशमुख, मास कार्यकारिणी संचालक श्री. संजय सूर्यवंशी, श्री. पृथ्वीराज पोळ, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. आदित्य मुतालिक, श्री. संग्राम कोरपे, सातारा कोविड डिफेंडर ग्रुप (SCD) चे अॅड. विनीत पाटील, श्री. कन्हैयालाल पुरोहित व जेष्ठ उद्योजक श्री. अजित बारटक्के उपस्थित होते.