Business Training
मास व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा मिटिंग.

  May 12,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा

यांचेकडे उद्योगांसाठी असलेल्या योजना व त्यांचा उपयोग उद्योजकांना कशा प्रकारे करता येईल. त्याचप्रमाणे सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना कुशल व अकुशल कामगार-कर्मचारी कशा प्रकारे मुबलक उपलब्ध होतील व इतर विषयाबाबत सविस्तर चर्चा करणेसाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व त्यांचे कार्यालयामधील अधिकारी यांची संयुक्त मिटिंग दिनांक १२ मे २०२२ रोजी “मासभवन” येथे आयोजित करण्यात आली होती.

 

मिटिंगच्या सुरुवातीस मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत मा. श्री. सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

 

सदर मिटिंगला मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, श्री. दीपक पाटील, मास कार्यकारिणी सदस्य श्री. आदित्य मुतालिक, श्री. संग्रामसिंह कोरपे, श्री. ईशान मळेकर व श्री. प्रशांत शिंदे, उपस्थित होते

 
मास ऑफिस