Green MAS
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व सद्यस्थितीतील जागतिक तापमान वाढीमुळे वृक्षारोपणाचे महत�

  

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व सद्यस्थितीतील जागतिक तापमान वाढीमुळे वृक्षारोपणाचे महत्व जाणून मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) – ग्रीन मास कमिटी मार्फत स्वदेशी (लिंब, तामण, अर्जुन, बकुळ, पिंपळ व बहावा) ३६० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. सदर उपक्रमामध्ये सर्व उद्योजक सहभागी व्हावेत, या उद्देशाने सर्व मास सभासदांना एक झाड देण्यात येऊन त्याचे सोबत खत व उद्योगाच्या परिसरामध्ये आवश्यकता वाटत असल्यास खड्डा खोदून व मास लोगो असलेले ट्री गार्ड देण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे उद्घाटन जेष्ठ उद्योजक मा. श्री. अजित मुथा यांचे हस्ते जागतिक पर्यावरणदिननिमित्त - ०५ जून रोजी मासभवन येथे करण्यात आले. मासभवन समोरील रस्त्यांच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी मा. मास माजी अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांच्या देशमुख उद्योग समुहास पुणे विभागातील पर्यावरणाचा " ग्रीन फॅक्टरी" प्रथम पुरस्कार हा मिळाला त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते यांनी सर्व मास सभासदांना आवाहन केले की, सर्व मास सभासदांनी सदर उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, किमान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन करावे, जेणेकरून सातारा औद्योगिक परिसर हिरवागार होण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे वसुंधरा संवर्धनास आपला हातभार लागेल. सदर कार्यक्रमास मा. मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव,सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, श्री. दीपक पाटील, माजी अध्यक्ष श्री. अरविंद शहा, श्री. गोविंद लेले, श्री.युवराज पवार, श्री. सुनिल व्यवहारे, श्री. दिलीप उटकूर, श्री.राजेश कोरपे, श्री. उदय देशमुख, ग्रीन मास कमिटी चेअरमन श्री. संग्रामसिंह कोरपे, मास कार्यकारिणी सदस्य श्री. केतन कोटणीस, श्री. सुहास फरांदे, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. अनुप मुथा, श्री. राहुल शिंदे, श्री. संतोष महामुलकर, श्री. ईशान मळेकर, मास सभासद श्री. मंदार कुलकर्णी उपस्थित होते.